ग्रामपंचायत कर व फी नियम, कर किती , कसे व का ?
गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी यावर कर आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आलेला आहे.
1.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि त्यातील कायदा कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० यामधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी यावर कर आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आलेला आहे. त्यामध्ये निवासी व औद्योगिक वापरानुसार घरपट्टीची आकारणी केली जाते. ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या अधिकृत वा अनधिकृत बांधकामावर कर आकारणी लावून कर वसूल करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. घरपट्टी आकारण्यासाठी सबंधित घर/इमारत ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये नोंद असायला हवी. कर दर पत्रक राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्र कर व फी सुधारणा नियम २०१५ साठी सुधारित अधिसूचना जाहीर केली असून या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून वसूल केली जाणारी घरपट्टी (कर) बांधकामांच्या भांडवली मूल्यावर आधारित असते. २०१५ पूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील घरांना प्रति चौरस फुटाला घरपट्टी आकारली जात होती. त्यात बदल करून भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारण्यासाठी अधिसूचना जाहीर केली. बांधकामाच्या भांडवली मूल्यावर किंवा त्याच्या भागावर पुढीलप्रमाणे कर ग्रामपंचायत आकारणी करते. इमारतीचे भांडवली मूल्य पुढील गणिती सूत्रानुसार निश्चित केले जाते.
इमारतीचे भांडवली मूल्य = 【 (इमारतीचे क्षेत्रफळ × जमिनीचे वार्षिक मूल्यदर ) + (इमारतीचे क्षेत्रफळ × बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामेचे दर × घसरा दर) 】× इमारतीच्या वापरानुसार भरांक
ग्रामपंचायतीला कलम १२४ अन्वये यात्रा, करपात्र जागा भाड्याने देणे, गाळा भाडे, जिल्हा परिषद अधिनियमानुसार मुद्रांक शुल्क, गौणखणीज, मोबाईल टॉवर यावर ग्रामपंचायतीला कर आकारणी करता येते.
गावाच्या महसुली हद्दीमध्ये नफा कमवण्यासाठी शासना व्यतिरिक्त इतर कोणीही इमारती बांधून त्याद्वारे नफा कमवत असेल तर त्यावर ग्रामपंचायतीला करआकारणी करता येते. यामध्ये प्रामुख्याने महावितरणच्या सर्व मालमत्ता, रस्ते महामंडळाच्या मालमत्ता, सौर पंखे, वीट भट्टी, वीज, शिक्षण संस्थाची हॉस्टेल या घटकांवर थेट आकारणी करता येते.
१) झोपडी किंवा मातीची इमारत किमान - ३० पैसे कमाल - ७५ पैसे
२ दगड, किंवा विटा वापरलेली किमान - ६० पैसे कमाल - १२० पैसे
मातीची इमारत.
३ दगड, बिटांची व चुना किंवा किमान - ७५ पैसे कमाल - १५० पैसे
सिमेंट वापरून उभारलेली इमारत.
४ आरसीसी पद्धतीची इमारत किमान - १२० पैसे कमाल - २०० पैसे.
खालील NEXT बटन वर क्लिक करून पूर्ण लेख वाचा
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?