ग्रामपंचायत कर व फी नियम, कर किती , कसे व का ?
गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी यावर कर आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आलेला आहे.

2. ग्रामपंचायत कर व फी आकारणी
जमिनीवरील कराचा दर :
जमिनीच्या प्रति रुपये १,००० च्या भांडवली मूल्यावर किंवा त्याच्या भागावर
किमान दर - १५० पैसे. कमाल दर -
५०० पैसे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १२४ नवे करआकारणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायत देण्यात आलेले आहेत
- गावाच्या इमारतीवर व जमिनीवर ग्रामपंचायत कर आकारता करता येतो.
- गावातील मोबाईल टॉवर, पवनचक्की यावर ही करआकारणी करता येतो.
- यात्रा कर, दुकाने, हॉटेल, आठवडी बाजार, सार्वजनिक स्वच्छता कर, दिवाबत्ती कर, आरोग्य सफाई कर, वाहनतळ जागा भाडे इत्यादींच्या संबंधात ग्रामपंचायत कर आकारणी करता येते.
- सामान्य पाणीपट्टी व खास पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे.
कलम ४५ अन्वये अनुसूची एकमधील विविध योजना राबवून ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढवता येते. कलम १२६ प्रमाणे आठवडी बाजार व बाजार यावर कर, विशेष कर आकारता येतो.
कलम १२७ जमीन महसुलाच्या प्रत्येक रुपयावर उपकर बसून तो महसूल विभागाकडून वसूल करून ग्रामपंचायतीला मिळण्याची तरतूद आहे.
प्रत्येक रुपयावर त्या त्या जिल्हा परिषदेने १०० पैसे या उपकाराने दर निश्चित करून उपकर निश्चित केला आहे. त्याप्रमाणे वसुली करून दरवर्षी ग्रामपंचायतीला मिळतो.
- कलम १३१ प्रमाणे प्रत्येक पाच वर्षांच्या कालावधीत मिळालेल्या जमीन महसुलीच्या रकमेच्या सरासरी इतकी रक्कम अनुदान म्हणून देणे यालाच ‘महसूल उपकर’ असे म्हणतात. पाच वर्षांच्या एकूण जमा झालेल्या महसुलाची वार्षिक सरासरी काढून तेवढी रक्कम ग्रामपंचायतीला जमीन महसूल उपकर म्हणून देण्याची तरतूद आहे.
खालील NEXT बटन वर क्लिक करून पूर्ण लेख वाचा
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






