ग्रामपंचायत कर व फी नियम, कर किती , कसे व का ?
गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी यावर कर आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आलेला आहे.

3. कर आकारणी समिती
जमिनीच्या किंवा इमारतीच्या कोमत्याही क्षेत्राच्या संबंधात आकारणीत सुधारणा करतेवेळी, कर आकारणी समिती इमारतीच्या बांधकामाच्या प्रकारानुसार, जसे की, जुने बांधकाम, वाढीव नवीन बांधकाम किंवा कोणतेही पाडण्यात आलेल्या बांधकामाचा भाग यानुसार कर आकारणी करील.
बहुमजली इमारतींच्या बाबतीत प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल.
छोट्या व्यवसायासाठी उदा. किराणा मालाचे दुकान, केशकर्तनालय, भाजीपाला विक्री गाळा (स्टॉल), चहाचे स्टॉल
इत्यादींकरिता उभारण्यात येणारे लोखंडी पत्र्याचे किंवा लाकडी फळ्याचे स्टॉल्स (टपऱ्या) यांचा समावेश दगड, विद
व चुना किंवा सिमेंट वापरून उभारलेली इमारत या प्रकारामध्ये करण्यात येईल.
लोखंडी खांब, अँगल्सचा व पत्र्याचा (लोखंडी व अस्बेस्टॉस) वापर करून लहान व मोठ्या कारखान्यांसाठी केलेल्या
बांधकामाचा समावेश आर.सी.सी. पद्धतीच्या इमारत प्रकारामध्ये करण्यात येईल.
जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन व तशाच प्रकाराशी निगडीत इमारती यांकरिता इमारतींच्या प्रकारांनुसार निवासी
वापराप्रमाणे कर आकारणी करण्यात येईल.
मोकळ्या भूखंडासाठी जमिनीच्या कराच्या दराप्रमाणे कर आकारणी करण्यात येईल.
गावातील जुन्या वाड्यांच्या बाबतीत, फक्त बांधकाम केलेले क्षेत्रच (वर छत असलेले) आकारणीसाठी विचारात
घेण्यात येईल. वाड्यातील मोकळ्या (वर छत नसलेल्या) जागेसाठी बखळ जागेच्या किमान दराने कर आकारणी
करण्यात येईल.
(अकरा) गावातील सन १९७० पूर्वी बांधलेल्या इमारतींवर कराची आकारणी करताना किमान दराने कराची आकारणी करणे.
कोणत्या तारखेपासून कर अमलात येईल ते.-- दिनांक १ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या व ३१ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षांसाठी
कर बसविण्यात येईल आणि तो कोणत्याही वर्षांतील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर किंवा १ जानेवारी या तारखांव्यतिरिक्त, इतर तारखांस
अंमलात येणार नाही ; आणि तो एप्रिल व्यतिरिक्त कोणत्याही इतर दिवशी अंमलात आला असेल तर तो त्यानंतर येणाऱ्या, १ एप्रिलपर्यंत
तिमाहीने बसविण्यात आला पाहिजे.
खालील NEXT बटन वर क्लिक करून पूर्ण लेख वाचा
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






