गंगापूर मध्ये राजनैतिक भूकंप राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेधर निळ हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गंगापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर निळ हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
गंगापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गंगापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर निळ, उपजिल्हाध्यक्ष अनिल बबलू पाटील पोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब सातपुते तालुका युवक अध्यक्ष किशोर गवांदे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष संदीप तोगे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, दिवटे युवक कार्याध्यक्ष आशुभाई शेख,तालुका उपाध्यक्ष गनी शेख, युवक जिल्हा उपाध्यक्ष जुनेद पटेल, अनिल देवकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी बढेकर,दिगंबर गायके, संजय ढोले,सोहेल पटेल, संतोष थोरात,रबी बकवाल,पंकज निळ,रमेश खांडे दादा, वाळूज सर्कल अध्यक्ष साबेर सय्यद यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकून शिवसेना (शिंदे गट) पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वैजापूर येथील जाहीर सभेत प्रवेश केला.
डॉ. ज्ञानेश्वर निळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घुसमट होतं होती कारण २0१४ पासून आजतागायत पक्षनेतृत्वाकडून अन्याय होत होता मात्र पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याने संधीची वाट पाहत होतो २0२४ लाही पक्ष नेतृत्वाकडून न्याय मिळाला नाही त्यामुळे सदरच्ची घुसमट कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सहन होत नव्हती म्हणुन कार्यकर्त्यांनी काहीतरी निर्णय घेण्याची विनंती केली त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहसत्व व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामावर प्रेरित होऊन शिवसेना पक्षात त्यांच्या शुभ हस्ते जाहीर प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, महिला, कामगार, यांना न्याय दिला आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्त्यांसह मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे याप्रसंगी खासदार संदिपानजी भुमरे साहेब आमदार र्मेश बोरणारे सर उपजिल्हाप्रमुख तथा माजी सभापती दिलीप सिंग राजपूत तालुका प्रमुख दिलीप निरपळ साहेब तालुका समन्वयक सारंगधर जाधव उपतालुकाप्रमुख संदीप मनोरे उपसभापती सचिन काकडे उपजिल्हाप्रमुख युवा सेना संतोष आरगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?