वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास २५ डिसेंबर हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून आपल्याला मान्य करून घेता येईल : सिध्दार्थ मोकळे
रांजणगाव शे. पू.: वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास २५ डिसेंबर हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून आपल्याला मान्य करून घेता येईल, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकावर प्रेम करणारे व पुस्तकांसाठी स्वतंत्र घर बांधणारे या जगातील एकमेव महामानव होते त्यांनी मनुस्मृती रुपी ग्रंथ जाळला यावरून आपल्याला अंदाज येईल ते पुस्तक तो ग्रंथ किती विशारी असेल याची कल्पना न केलेली बरी असे परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे म्हणाले आहे.
काँग्रेस व इतर पक्षांना वंचित दलितांचे मते पाहिजे, नेता नको अशी भूमिका जातीयवादी पक्ष घेत असुन वंचित बहुजन समाजातील महिलांनी आता जागरूक राहिले पाहिजे राजकारणात वेळ दिला पाहिजे अनेक वर्षांपासून अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली अगोदर राज्य व नंतर जिल्हा स्तरावर स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन करण्यात येते व या माध्यमातून २५ डिसेंबर हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केल्या जाते परंतु या पक्षांची मानसिकता आजही जातीयवादी आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांनी आज स्त्री मुक्ती दिन परिषदेत बोलताना मत व्यक्त केले.
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी मला विधानसभा सभेची उमेदवारी दिली त्यानंतर मतदार संघात फिरत असताना येणारा अनुभव हा कोण्या पुस्तकात कधीच वाचायला मिळाला नसता आणि वाचल्यात सुध्दा नाही तो जो अनुभव मला आला आणि येतो आहे त्यामुळे मला वंचित बहुजन आघाडीत काम करण्याची प्रेरणा मिळाली व वंचित समुहाचे दुःख जवळून पाहता आले जी मनुस्मृती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली त्या मनुस्मृतीच्या जोखडातून हा बहुजन समाजाला बाहेर काढले तेच काम अँड बाळासाहेब आंबेडकर करत आहे त्यामुळे मी बाळासाहेबांचे खूप ऋणी आहे असेही त्या म्हणाल्या यावेळी विविध ठरावाचे वाचन करण्यात आले.
आज रांजणगाव शे. पू. ता. गंगापूर येथे येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते
या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे,वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट, वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सविता ताई मुंडे, फुले आंबेडकर विद्वत सभेच्या डॉ प्रज्ञा ताई साळवे, महिला आघाडीच्या प्रभाताई होशील, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
स्त्री मुक्ती दिन परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे,तर स्वागताध्यक्षा रत्नमाला पवार व औरंगाबाद शहराध्यक्षा वंदना नरवडे होत्या या परिषदेचे उद्घाटन राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी केले यावेळी पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा उपाध्यक्ष शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा सह सचिव अशोक खिल्लारे, शाहीर मेघानंद जाधव,युवा आघाडीचे गंगापूर तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ,महिला आघाडीच्या गंगापूर तालुका अध्यक्ष जयाताई सदावर्ते, कोमल हिवाळे, सुलोचना साबळे, आशाताई मोरे, सुनयना मगर, निर्मला शेजवळ, वंदना खिल्लारे, रवि रत्नपारखे , प्रवीण जाधव,अमृतराव डोगरदिवे, अर्जुन अभग, हनीफ पटेल,ससाने शालिनीताई बर्फे, अलका ताई सुरडकर, पंडितराव तुपे, आशा ताई मोरे, सुनयना मगर, विद्याताई दिवेकर, प्रमोद पतंगे,सिमा भंडारे, आदींसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?