लिंबे जळगाव ग्राम पंचायत; वारंवार जल वाहिनी चे वायर/मोटार जळणे किंवा पाईप लाईन फुटणे संयोग की प्रयोग
ग्राम पंचायत लिंबे जळगाव भ्रष्टाचाराच्या विळख्यात; पंचायत समिती कार्यालय गंगापूर ने स्वतः लक्ष देण्याची गरज
लिंबे जळगाव : ग्रुप ग्राम पंचायत असलेल्या लिंबे जळगाव अंतर्गत रहिमपूर, अब्दुलपूर या गावांना भर पावसाळ्यात ही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, या गावांना पाणी पुरवठा ज्या कालव्यातून केला जातो तो ५०% हि जास्त भरलेला असून सुद्धा नागरिकांना पाणी टंचाई जाणवत आहे कारण फक्तं पाणी पुरवठा साठी उपयोग होणारे साहित्य जळणे किंवा फुटणे ज्या मुळे गावांना पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही.
गेल्या १० दिवसांपासून रहिमपूर गावातील काही ठिकाणी नळाला पाणीच आले नाही त्यामूळे या ठिकाणाचे महीला आणी मुले गावा लगत असलेल्या विहिरीतून पानी शेंदून आणत आहेत, पण यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे कारण की पावसाळा चालू असल्या कारणाने वाहणारे पाणी सुद्धा विहिरीत जाण्याची भरपूर शक्यता आहे .
रोगराई पसरण्याची दाट शक्यता
वारंवार ठीक ठिकाणी फुटणाऱ्या पाईप लाईन मुळे जलवाहिनित दूषित पाणी मिसळत असल्याचे दिसून आले आहे.
समस्या अनेक कारण फक्तं एक; भ्रष्टाचार
पाणी पुरवठा साठी उपयोग होणारे साहित्य उत्कृष्ठ दर्जाचे नाहीत का आणि जर ते उत्कृष्ठ दर्जाचे असतील तर मंग ते वारंवार खराब का होताहेत या मागचे कारण काय? जे साहित्य आहेत ते ISI मारकेड आहेत की नाही याची खात्री ग्राम पंचायत ने केली पाहिजे.
दिवाळी सण अगोदर लावलेले काही पथ दिवे मोजक्या महिन्यातच बंद पडले आहेत
उत्कृष्ठ दर्जाचे असलेले पथ दिवे कमीत कमी एक ते दोन वर्ष वॉरंटी चे असतात. ग्राम पंचायत तर्फे लावण्यात आलेले पथ दिवे बंद पडली आहेत ज्याकडे ग्राम पंचायत ने लक्ष घालून त्या पथ दिव्यांची डाग डुजी करावी जेणे करून नागरिकांना त्याचा फायदा होईल.
रहिमपूर गावात अजूनही रस्त्यावरून वाहते सांडपाणी
जेमतेम ३ गल्ल्या असलेले छोटेसे गाव त्यामध्ये सुद्धा पूर्ण गावाला सिमेंट रस्ते नाहीत, सांड पाण्याची व्यवस्था नाही.
असल्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. आणि याकडे पंचायत समिती कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे असेही ग्रामस्थांची मागणी आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?