लिंबे जळगाव ग्रुप ग्राम पंचायतच्या जलवाहिनीचे पाणी चोरी की विक्री?
ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही ग्राम पंचायत कर्यालाकडून कोणतीही कार्यवाही नाही
लिंबे जळगाव : ग्रुप ग्राम पंचायत लिंबे जळगाव वॉर्ड क्रमांक १ रहीमपूर संपूर्ण गाव ग्राम पंचायतिच्या जल वाहिनीवर अवलंबून आहे, जलवाहिनीच्या पाणी शिवाय इतर कोणतेही साधन उपलब्ध नाही,
गावात सार्वजनिक विहीर, हातपंप इत्यादी सारखे कोणतेही साधन उपलब्ध नसून गावात ५ ते ६ दिवसा आड नळाला पाणी सोडण्यात येते त्यासाठी संपूर्ण गाव पाणी साठवणूक करून ठेवतात पण काही महिन्यांपासून गावात अचानक पाणी खूपच कमी सोडण्यात येऊ लागले,
ग्रामस्थ पाण्यासाठी वारंवार ग्राम पंचायत कार्यालयाला तक्रार करू लागले पण ग्राम पंचायत कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया होत नसल्याचे पाहून ग्रामस्थ स्वतः पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रात्री च्या वेळी ज्या ज्या ठिकाणाहून गावात जलवाहिनी येते त्या ठिकाणी पाहणी करू लागले, असता काही ग्रामस्थांना एका शेतातील विहिरीत पाईप लाईन द्वारे वरून पाणी कोसळतांना दिसले म्हणून लोकांनी त्या पाईप लाईन चे कनेक्शन पाहण्यास सुरुवात केली असता असे आडळून आले की सर्व ग्रामस्थ थक्क झाले.
हा कनेक्शन सरळ ग्राम पंचायतच्या जलवाहिनीला जोडलेला आढळला. ज्या ठिकाणी लोकांना प्यायला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाहीये तेच लोकांच्या हिस्स्याचे पाणी शेतात सोडले जात आहे .
आणि वारंवार तक्रार करूनही ग्राम पंचायत कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही का होत नाही आणि तेच पाणी शेतात सोडले जात असल्याने ग्रामस्थांना शंका होत आहे की पाणी चोरी होत आहे की विक्री केली जात आहे ?
गावातील लोकांना पाणीपुरवठा न करता दुसऱ्यांच्या विहिरीत पाणी सोडून स्वतःच्या शेतात पाणी वडवले व शेतातील काही पीक काढले याबद्दल कायदेशीर सक्तीची कारवाई करण्यात यावी ग्रामस्थांची मागणी आहे.
वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ महिला व पुरुष यांचा गंगापूर तहसील कार्यालयावर पाणी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे .
यामध्ये महेताब पठाण, नवाज शेख, शकील शेख, मोहसीन शेख, समीर पठाण, गणी शेख व इतर महिलांचा समावेश आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?