महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

1. महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
महाराष्ट्रात सन 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये लोकांना रोजगारप्रधान कामांची उपलब्धता करून
देण्यात आली होती. राज्यातील मजुरांना रोजगाराची शाश्वत हमी मिळावी व त्या माध्यमातुन मत्ता निर्मिती
व्हावी या दृष्टीकोतून महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 अन्वये महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कार्यान्वित
करण्यात आली. या योजनेचे जनकत्व् महाराष्ट्राकडे आहे. त्याच धर्तीवर महात्मा गांधी राष्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजना अधिनियम 2005 अंतर्गत राज्यामध्ये मग्रारोहयो टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. 2006 पासून संपूर्ण
राज्यात हि योजना लागू करण्यात आली आहे.
योजनेचा मुख्य् उददेश ग्रामीण कुटुंबांना गरीबी व भुकेपासून वाचवण्याचा आहे. तसेच उत्पादक मालमत्तेची
निर्मिती, पर्यावरण सुरक्षा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण-शहरी स्थलांतरावर नियंत्रण सामाजिक समतेला
प्रोत्साहन देऊन योजने मार्फत आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एक संधी आहे.याची
मुख्य् जबाबदारी ग्रामपंचायत आणि ग्रामसभेची आहे. ज्याअर्थी ग्रामसभा कामाची निवड करून ते कार्यान्वित करून
ग्रामपंचायतीमध्ये एक चांगल्या प्रकारची मत्ता तयार होऊ शकते, ज्या आधारे ग्रामपंचायतीची पर्यायाने स्थानिक
लोकांची प्रगती होऊन राहणीमान उंचावण्यास मदत होईल.
मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसभेत कामांची निवड करणे आवश्यक आहे ज्याकरिता
गावात शिवार फेरी घेऊन उपलब्ध नैसर्गिक स्त्रोत ठरवून त्याअनुषंगाने कामांची निवड केली जाते. ग्रामसभेने
ठरविलेल्या कामांची यादी तयार करून त्याबाबत 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत चर्चा करून 2 ऑक्टोबर
रोजीच्या ग्रामसभेत ठरावाव्दारे कामांना मान्यता घेण्यात येते. ज्यामध्ये सिंचन सुविधा, बांधावर वृक्ष लागवड,
फळबाग लागवड, रस्ते, कृषी प्रधान कामे इत्यादी वैयक्तीक तसेच गॅबीयन बंधारा, बांधबंदिस्ती, वृक्षलागवड,
इत्यादी सार्वजनिक प्रकारची कामे घेता येऊ शकतात.
खालील NEXT बटन वर क्लिक करून पूर्ण लेख वाचा
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






