महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

2. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये:
१. महाराष्ट्र अंतर्गत नोंदणीकृत ग्रामीण घरातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीस अकुशल रोजगाराचा हक्क आहे. यासाठी
कुटुंबनिहाय (12०05612०1 0) जॉबकार्ड तयार केले जाते.
२. “मागेल त्याला काम” या तत्वावर प्रत्येक कुटुंबास एका वित्तीय वर्षात केंद्र शासनामार्फत 100 दिवसांपर्यंत
अकुशल रोजगाराची हमी दिली आहे. उर्वरित 265 दिवसांची हमी राज्य् शासनामार्फत देण्यात आली
आहे.
३. कायदयाच्या अंमलबजावणीची प्राथमिक जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.
४. प्रतिदिन मजुरीचा दर केंद्र शासनामार्फत निश्चीत करण्यात येतो. 1 एप्रिल 2021 पासुन महाराष्ट्रात हा दर
248/- रूपये आहे.
५. मजुरीचा दर स्त्री व पुरूष यांना समान आहे.
६. गावाच्या परिसरात 5 किलोमीटर च्या आत काम उपलब्ध् करून देण्यात येते.
७. कायदयात नमुद केल्यानुसार काम मागणी केल्यानंतर 15 दिवसांचे आत काम उपलब्ध करून देणे
बंधनकारक आहे. जर काम उपलब्ध करून देण्यात आले नाही तर मजुरांना खालील प्रमाणे बेरोजगार भत्ता
देण्याबाबत कायदयात नमुद करण्यात आले आहे.
अ) बेरोजगार भत्ता कार्यक्रम अधिकारी यांचे मार्फत दिला जाईल.
आ) किमान वेतन दराच्या पहिल्या 30 दिवसांसाठी 25 टक्के व उर्वरीत दिवसांसाठी 50 टक्के 100
दिवसांच्या अकुशल रोजगाराच्या मर्यादेत देय असेल.
८. हजेरी पत्रकाचा कालावधी संपल्यावर 8 दिवसांचे आत मजुरांच्या खात्यावर मजुरी अदा करणे बंधनकारक.
९. मग्रारोहयोच्या कामांवर कंत्राटदार नेमण्यास बंदी आहे.
१०. किमान 50 टक्के कामे ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत करणे बंधनकारक आहे उर्वरीत 50 ट्क्के काम इतर
यंत्रणेमार्फत करता येऊ शकतात.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






