महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

6. वार्षिक कामांचा आराखडा तयार करणे:
ग्रामसभेत कामांची निवड करणे आवश्यक आहे ज्याकरीता गावात शिवार फेरी घेऊन उपलब्ध् नैसर्गीक
स्त्रोत ठरवून त्याअनुषंगाने कामांची निवड केली जाते. ग्रामसभेने ठरविलेल्या कामांची यादी तयार करून
त्याबाबत 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत चर्चा करून 2 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत कामांना ठरावाव्दारे
मान्यता घेण्यात येते. लाभर्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे सिंचन सुविधा, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड,
कृषीप्रधान तसेच गाव विकासाच्या दृष्टीकोनातून रस्ते, गाळ काढणे, गॅबीयन बंधारा, वृक्षलागवड इत्यादी
प्रकारची सार्वजनिक कामे घेता येऊ शकतात.
> ग्राम सभेची मान्यता घेतल्यानंतंर कृती आराखडा सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी
यांचेकडे मान्यतेस्तव ग्रामपंचायत मार्फत सादर करण्यात येतो.
> सर्व ग्राम पंचायत स्तरावरून प्राप्त कृती आराखडयांना एकत्रित करून पंचायत समितीची मान्यता घेऊन
जिल्हा परिषदेच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदकडे सादर करण्या येतो.
> मग्रारोहयो कक्ष जिल्हा परिषद मार्फत सर्व तालुक्यांचा एकत्रीत कृती आराखडा मा. जिल्हा परिषद
अध्यक्ष व मा. सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने
सर्वसाधारण सभा / स्थायी समिती सभेत मान्यतेस्तव सादर करण्यात येते.
> जिल्हा परिषदे मार्फत मान्य करण्यात आलेले कृती आराखडा व लेबर बजेट मा. आयुक्त, नरेगा
नागपूर यांचेकडे पाठवण्यात येतो.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






