महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

8. ग्रामरोजगारसेवकांची निवड, कर्तव्य व प्रमुख जबाबदारी:
प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ग्रामरोजगार सेवकाची निवड केली जाते. मात्र ग्रामपंचायत जर मोठी
असेल किंवा लोकसंख्या जास्त असेल किंवा आदिवासी भागांमध्ये ग्रामपंचायत जशी विखुरलेली असते अशा प्रकारे
ग्रामपंचायत विखुरलेली असेल, फक्त अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीमध्ये एका पेक्षा जास्त ग्रामरोजगार सेवकाची
निवड करता येऊ शकते. हे निवडण्याचे अधिकार त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला असतात.
मनरेगाच्या संदर्भातील ग्रामपंचायतपातळीवर सर्वप्रकारचे अभिलेखे तयार करणे ते जतन
करणे व त्यावर स्वाक्षरी करणे.
कै ग्रामरोजगारसेवक आणि एक ग्रामसेवकाचे मार्गदर्शनाखाली अभिलेख्यांमध्ये सर्वप्रकारच्या नोंदी घ्याव्यात तसेच सर्व
अभिलेखे योग्य प्रकारे व्यवस्थितपणे व परिपूर्ण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची राहील, तथा
नियंत्रण व प्रतिस्वाक्षरी ग्रामसेवकाची राहील.
ब भविष्यात मजुरांच्या हजेरीसाठी वापरावयाची यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची क्षमता व तयारी
असावी.
ब मजूरांचे हुजेरीपत्रक तयार करणे ते भरणे व सांभाळणे.
ब रोजगार कार्यक्रम गावात सुरळीतपणे व सुनियोजितपणे राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवकाच्या
मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणे.
बॉ मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना व तत्सम तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणे व शासनाच्या आणि पंचायत
समितीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार कार्यक्रमा संदर्भात सहाय्य करणे.
ब मस्टररोल गट विकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणे आणि बँक संपर्क साधून मजुरांच्या मजुरी प्रदानास विलंब
होणार नाही याबाबत दक्ष राहणे.
ँ मस्टरची प्राथमिक जबाबदारी रोजगार सेवकाची राहील.
बँ ग्राम रोजगार सेवकाने ठराविक दिवशी किंवा वेळी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून कामाचे नियोजन करावे
आणि त्याबाबतची माहिती ग्रामसेवकाला देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करावे.
बौ ग्राम रोजगार सेवक यांनी ग्रामपंचायत व इतर यंत्रणा यंत्रणांवरील कामांसाठी निर्गमीत केलेल्या हजेरी पत्रकावर
नोंदी घेणे बंधनकारक आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






