गंगापूर येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची वंचीत बहुजन आघाडी कार्यकर्त्यांची भेट
वाळुंज, जिकठाण फाटा, गंगापूर येथे भेट

वंचित बहुजन आघाडीच्या आज गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी गंगापूर येथे उपोषण चालू आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना ३० ऑक्टोबर रोजी पत्र दिले तेच पत्र आज वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने तालूक्यात सुरू असलेल्या वाळुंज, जिकठाण फाटा, गंगापूर येथे उपोषणाच्या ठिकाणी वाचण करून देण्यात आले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाच्या प्रत्येक भूमिकेत सक्रिय सहभाग नोंदवत राहील असे यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी जाहीर केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर , तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, जिल्हा सहसचिव अशोक खिल्लारे, जिल्हा सचिव संदीप जाधव, जिल्हा संघटक देविदास लांडे पाटील, गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, जेष्ठ नेते माणिकराव करवंजे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवि रत्नपारखे,तालुका सचिव कान्हू भालेराव, वाळूज शहराध्यक्ष संतोष जमधडे,
लिंबे जळगाव ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील जाधव, लिंबे जळगाव सर्कल अध्यक्ष सइद बाबा पठाण,दत्तू तारक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






