वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 29 डिसेंबर रोजी भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन
वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद, स्त्री मुक्ती दिन, नागपूर, अँड बाळासाहेब आंबेडकर
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद शहर जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मनुस्मृती दहन दिन हा खरा स्त्री मुक्ती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो परंतु यावर्षी नागपूर येथे 25 डिसेंबर 2023 रोजी पक्ष नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत हि परिषद संपन्न झाली त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या व शहराच्या वतीने घेण्यात येणारी 25 डिसेंबर रोजी ची भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद हि 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगाव शे.पू. ता. गंगापूर येथे आयोजित करण्यात आली आहे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे राहणार आहे
या परिषदेला वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट, सविता ताई मुंडे,शमीभा पाटील, प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, अमित भूईगळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष म्हणून शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार आहेत
अशी माहिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा वंदना नरवडे, वंचित बहुजन आघाडीचे मध्य युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, महिला आघाडीच्या साधनाताई पठारे,कोमल हिवाळे, सुनयना मगर, मंगल दाभाडे, रवि रत्नपारखे, हेमंत सोनवणे, किशोर निकाळजे, अशोक बनकर आदी उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?