रहिमपूरच्या शाळेला तलावाचे स्वरूप
येरे माझ्या सोन्या : तीन फूट पाण्यातून काढावा लागतो मार्ग
लिंबे जलगांव : ‘नेमेचि येतो पावसाळा’ यानुसार रहिमपूर येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी कार्यालयाला तलावाचे स्वरूप आले आहे. प्रत्येक वर्षी जुजबी उपाययोजना करून दिवस ढकलले जात आहे. कायमस्वरूपी पर्याय काढला नसल्याने याहीवर्षी विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वर्गात जावे लागत आहे. गेली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथे सर्वत्र पाण्याचे डबके साचले आहे. शाळा परिसरासह आणि झोपडपट्टी भागाला पाण्याने वेढले आहे. शाळेच्या आवारात तीन ते चार फूट पाणी आहे. पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्या बुजल्या आहे. घर परिसरात पाणी साचून असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. काही भागात वृक्षांची पडझड झाली आहे.
शाळेत शिरल्याने शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली तर विद्यार्थ्यांना डेस्कवर उभे राहण्याची वेळ आली.
रहिमपूर येथे जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीं पर्यंतची शाळा आहे. शिवाय या शाळेच्या इमारतीत अंगणवाडी देखील आहे. या शाळेत १५०-२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी शाळेसमोरील रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये सदरचा रस्ता अधिक उंच असल्याने सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे रस्त्यावरील पाणी थेट शाळेत शिरत आहे. त्यातच शाळेचे खिडक्या दरवाजे तुटले असल्याचे काही ठिकाणी पाणी गळत असल्याची तक्रार शिक्षकांनी दिली. रस्त्यावरील पाणी शाळेमध्ये साचल्याने वर्गखोल्यांना तलावाचे स्वरूप आले होते. चक्क वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना डेस्कवर उभे रहावे लागले. उद्याचे जबाबदार नागरिक घडविणाऱ्या शाळेच्या या दुरावस्थेबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. याची माहिती (अन्नू लाला) यानी रइटपोस्ट ला दिली असता रइटपोस्ट चे मुख्य संपादक (जमीर शेख़) यानी शाळेत जाउन पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या दुरावस्थेमुळे पाल्य असुरक्षित असल्याच्या भावना व्यक्त करीत पालकांनी संताप व्यक्त केला.
शिक्षकांच्या मेहनतीने नावलौकिक झालेली ही शाळा गुत्तेदारीचा वारसा लाभलेल्या स्थानिक राजकारण्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारा विकास निधीमधून खोली बांधकाम, शालेय साहित्य, यंत्रसामग्री, संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक आदी कामात प्रचंड भ्रष्टाचार करून थातूरमातूर व सुमार दर्जाची कामे करून बीले लाटण्या पलीकडे दुसरा कुठलाच सकारात्मक हेतू येथील मंडळीचा नाही.
What's Your Reaction?