रहीमपूर गावातील पाणी प्रकरण तापले; दोषिंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ग्रामस्थ पोहचले पंचायत समिती आणि तहसील कार्यालयावर
लिंबे जळगाव : रहीमपूर गावातील व्हायरल व्हिडिओ १९ मार्च रोजी व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून ग्रामस्थ संतापलेले असताना सुद्धा ग्राम पंचायत तर्फे उडवा उडविचे उत्तर येत असल्या कारणाने आता रहीमपूर ग्रामस्थ खूपच संतापलेले असून काही ग्रामस्थ सरळ पंचायत समिती कर्यालावर जावून धडकले आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
रहीमपुर गावात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणटंचाई जाणवत होती आणि ग्रामस्थ वर वारंवार ग्राम पंचायत कार्यालयाकडे तक्रार करत होते तरी पण ग्राम पंचायत कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाहीये म्हणून ग्रामस्थांनी स्वतः पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाहाणी सुरु केली असता त्यांना रात्री च्या वेळी एका खाजगी विहिरीत पाणी सोडण्यात येत असल्याचे आढळले आणि त्या पाण्याचे स्त्रोत पाहण्यास सुरुवात झाली असता कळाले की ते पाणी सरळ ग्राम पंचायतच्या जल वाहिनीतून येत आहे.
मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना आणि ग्रामस्थांना पाणी नाही
पाणी चा जो काही व्हिडीओ व्हायरल झालेला आहे तो पाहूनही ग्राम पंचायत कार्यालयाकडून योग्य ती कारवाई न होता ग्रामस्थांना उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याने ग्रामस्थांना न्याय मिळावा म्हणून ग्रामस्थ सरळ पंचायत समिती कार्यालयावर जावून धडकले आणि योग्य कारवाही करण्याचे आवाहन केले.
कार्यवाही न केल्यास पंचायत समिती कार्यालयावर उपोषणासाठी बसू असा इशारा ही ग्रामस्थांकडून देण्यात आला.
पाणी प्रकरण बाबत बातमी प्रसिद्ध केल्यामुळे राईटपोस्ट च्या पत्रकाराला ही ह्या बाबत दबाव आणला जात असून ज्या काही लोकांनी राईटपोस्ट ची बातमी इतरत्र शेअर केली त्यांना सुद्धा आपल्या WhatsApp ग्रुप मधून काढण्यात आल्याचे समोर आले आहे .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?