लिंबे जळगावातील रस्त्याचे काम पुनः सुरू ; दर्जेदार काम करण्याचे आश्वासन
काही ग्रामस्थांची तक्रार आल्याने ग्राम पंचायत कार्यालयाने दाखल घेत दर्जेदार काम करण्याचे दिले आश्वासन
लिंबे जळगाव : गावातील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये २० x ३०० लांबी आणि रुंदी प्रमाणे सीमेंट रोड चे काम सुरू असून दोन दिवसा पूर्वी काही ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली की कंत्रातदारमार्फत होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, म्हणून हे होणारे काम थांबवण्यात आले .
आणि त्याच दिवशी लगेच याची दखल घेत वॉर्ड क्रमांक दोन चे ग्राम पंचायत सदस्य मुसा पटेल आणि नवनाथ निरफळ यांनी त्वरित काम थांबवून कंत्रातदारला सूचना दिली की हे काम दर्जेदार स्वरूपातच झाले पाहिजे म्हणून कंत्रातदाराने ही लगेच योग्य स्वरूपात दर्जेदार कामाची सुरुवात केली. आणि आश्वासन दिले आहे की आता कामात कोणतीही कमतरता निर्माण होणार नाही आणि आमच्या मार्फत दर्जेदार काम करून दिल्या जाईल .
ग्राम पंचायत सदस्य स्वतः उभे राहून कामाची करताहेत पाहणी
तक्रारी येत असल्याने ग्राम पंचायत सदस्य मुसा पटेल आणि नवनाथ निरफळ स्वतः कामाच्या ठिकाणी उभे राहून कामाची पाहणी करत आहे .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?