आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील पारधी महिलेला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले निवेदन

बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे जमीनीच्या वादातून एका पारधी समाजाच्या महिलेल्या आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस आणि त्यांचा गुंडांनी मारहाण करून कुटुंब संपवण्याची धमकी दिली तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली एवढेच नव्हे तर पिडीत महिलेने आमदार पत्नी सोबत २० ते २५ गुंड असल्याचे फिर्यादीत म्हटले असताना सुद्धा आष्टी पोलिसांनी प्राजक्ता सुरेश धस यांच्यासह फक्त तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही आरोपी हे भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी असल्यामुळे स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही या प्रकरणांची चौकशी पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यांत यावी व आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची कार्यक्षेत्राच्या बाहेर बदली करण्यांत यावी जेणेकरून या प्रकरणाची चौकशी निःपक्ष पणे होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने त्यांचे वाचक पोलिस उप अधीक्षक विश्र्वांबर बी गोल्डे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवि रत्नपारखे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे घडलेल्या प्रकरणांची सविस्तर माहिती घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलिस उप अधीक्षक विश्र्वांबर बी गोल्डे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






