रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कुठेही लिंकिंग होणार नाही - कृषिमंत्री
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून इतके लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ज्वारीच्या मिनिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत

पुणे : पुण्यातील साखर संकुल येथे राज्यस्तरीय रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. यामध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब म्हणाले आहेत की रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कुठेही लिंकिंग होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. महाराष्ट्रात रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र सुमारे 58 लाख हेक्टर असून या क्षेत्रात किमान 5 लाख हेक्टरची वाढ करण्यात यावी, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून 3 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ज्वारीच्या मिनिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पारंपरिक ज्वारी, गहू, मका, हरभरा याचबरोबर करडई, मसूर, राजमा, पावटा, वाल, मोहरी, जवस याही पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशाही सूचना केल्या आहेत. बी-बियाणे, खते यांची उपलब्धी शेतकऱ्यांना माहीत असावी, यासाठी जिल्हा स्तरावर डॅश बोर्ड विकसित केले जातील. पीक कर्ज वाटपाचे संनियंत्रण आयुक्त स्तरावरून दर आठवड्याला केले जाईल. शेतकऱ्यांचे हित जोपासताना गरज भासल्यास शासकीय कॅनव्हासच्या बाहेर जाऊन काम करावे, मात्र आता शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी मिळून काम करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






