वंचित बहुजन आघाडी मिडिया विभाग प्रमुख सिद्धार्थ मोकळे यांचा सत्कार
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांची अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षाच्या मीडिया विभाग प्रमुख पदी निवड केली असून केंद्रीय, राज्य,विभागीय,जिल्हा आणि स्थानिक कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षांचे माध्यमं व्यवस्थापन करण्याची व पक्षाचे कार्यक्रम व ध्येय धोरणांची व्यापक प्रसिद्धी करण्याची जबाबदारी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर सोपवली आहे असे पत्र नियुकतेच अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी काढले आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून पक्षाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची भुमिका राज्यातील गाव खेड्यांपर्यंत पोहचविण्यात सिध्दार्थ मोकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे ते औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भुमिपुत्र आहेत त्या निमित्त आज सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, वंचित बहुजन आघाडीचे पच्श्रिम जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पच्श्रिम जि महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, स्टार प्रचारक मेघानंद जाधव, जिल्हा सचिव संदीप जाधव, सागर मोरे, रविरत्नपारखे, ऋषिकेश गायकवाड, सागर धोडपकर,आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?