गोदावरी नदीला पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन.
वंचित बहुजन आघाडीची कार्यकारी संचालक यांच्याकडे मागणी
औरंगाबाद : जायकवाडी धरणामध्ये पाणी साठा कमी असल्याकारणाने जायकवाडी धरणामध्ये तात्काळ पाणी सोडण्यात यावे.असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी द तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक विजय घोगरे यांना दिले होते यावेळी दसरा सणापर्यंत पाणी सोडू असे आश्वासित केले होते.
परंतु दसरा होऊन गेला तरी , पाणी सोडण्याची कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून झालेली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुन्हा दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी निवेदन देऊन,आठ दिवसाचा आत पाणी सोडण्यात यावे. असे निवेदन देऊन १ नोव्हेंबर २०२३ रोजी, दुपारी १.०० वाजता आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बजावले होते जाईल तरीही पाणी सोडले नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संचालक यांना शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिले निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठवाड्यातील बाभळी बंधाऱ्याचे पाणी निर्धारित तारखेस तेलंगना राज्यास २.२५ टीएमसी तात्काळ सोडले. त्याच धर्तीवर जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासनातून का विलंब होत आहे ?का यावर कुणाचा दबाव होता, हे अनाकलनीय आहे. किती पाणी सोडवायचे याचा हिशोब करण्यात शासनाने पंधरा दिवस घातले आहेत. वंचित बहुजन आघाडीने आज शांततेत आंदोलन केले परंतु प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडण्याची कार्यवाही केली नाही तर वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जितेंद्र शिरसाठ, महेश निनाळे,तयब जफर,दिपक डोके, प्रभाकर बकले, योगेश बन,युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, शहराध्यक्ष पच्श्रिम संदिप शिरसाट, शहराध्यक्ष मध्य जलीस अहेमद, जिल्हा उपाध्यक्ष शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा उपाध्यक्ष पी के दाभाडे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे,औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, शाहीर मेघानंद जाधव, जिल्हा संघटक भारत दाभाडे, गणेश खोतकर, मिलिंद बोर्डे, संघराज धम्मकिर्ती, सुलोचना साबळे, कोमल हिवाळे, सतिश महापुरे, मंगेश निकम, बाबासाहेब दुशिग,ज्ञानशील वाघमारे,आण्णा जाधव, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जाधव, वाळूज जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष दिलीप आरक,लिंबे जळगाव सर्कल अध्यक्ष सइद बाबा पठाण, शालिनीताई बर्फे, निर्मला शेजवळ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?