अंजन साळवे यांना औरंगाबाद पच्श्रिम विधानसभा मतदारसंघातून वंचित ने उमेदवारी द्यावी
सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनांसह बुध्द विहार समिती ची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांना वंचित बहुजन आघाडी ने आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने उमेदवारी देऊन एका होतकरू कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी औरंगाबाद पच्श्रिम तालूक्यातील पंढरपूर, बजाजनगर, दौलताबाद, वडगांव कोल्हाटी, सातारा,साजापूर, माळीवाडा,गोलवाडी, तिसगाव, म्हाडा, वळदगाव, गाधेली, राहुल नगर, इटखेडा, पाटोदा, कांचनवाडी, जालान नगर आदी बौद्ध विहार समित्यांनी केली २१ जुलै रोजी अंजन साळवे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने औरंगाबाद पच्श्रिम विधानसभा मतदारसंघातील वकील, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योगपती बुध्द विहार समिती, वाळूज महानगर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी सर्व स्तरातील लोकांनी अंजन साळवे हे गेल्या पाच वर्षापासून ह्या मतदारसंघांत विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असून पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत मागच्यावेळी अंजन साळवे हे या मतदारसंघात इच्छुक होते परंतु पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली तरीही अंजन साळवे यांनी पक्षांचे इमानेइतबारे काम करून औरंगाबाद पच्श्रिम विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मतदान मिळवून दिले यांची दखल पक्षाने घ्यावी अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी आयोजक अंजन साळवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर,फूले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा भारत शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा उपाध्यक्ष पी के दाभाडे, आर पी आय (A)जिल्हा सरचिटणीस प्रवीण अप्पा नितनवरे, आर पी आय (A)जिल्हा उपाध्यक्ष रमेश दाभाडे,अँड नामदेव सावंत , अँड. अनिल सपकाळ, अँड, अनिल मोरे,आदींसह मान्यवरांनी मार्गदर्शन केले
यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, पंडितराव तुपे,जिल्हा सह संघटक सिध्दार्थ बनकर, जिल्हा सदस्य रवी रत्नपारखी,तालुका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष सतीश महापूरे , तालुका उपाध्यक्ष अनिल थोरात, तालुका उपाध्यक्ष प्रेम बनकर,तालुका संघटक अशोक त्रिभुवन, तालुका संघटक दीपक रगडे, तालुका संघटक आनंद खरात,तालुका सचिव अरविंद पवार, तालुका सचिव गणेश गाडेकर, तालुका सदस्य विलास कांबळे, ज्ञानशील वाघमारे, अण्णा जाधव, गोरखनाथ तुपे, भानुदास किर्तीकर, सुधीर शेषवरे, एल एल गायकवाड, रामदास बर्फ, युवराज ओव्हाळ, विष्णु जाधव,उद्योजक नितीन नरवडे, उद्योजक संदीप साळवे, उद्योजक विजय बागुल, उद्योजक विकास रामटेके ,मनोज साळवे, रमेश थोरात,राजेंद्र साळवे , सचिन जमधडे, दीपक दाभाडे, धीरज खैरे, किरण साळवे, सागर तुपे,शुभम साळवे, राहुल जाधव,अभिषेक दाभाडे, जीवन त्रिभुवन, बाबासाहेब वक्ते, अमोल हॉर्शिल,
आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर आंबेडकरी चळवळींचे पदाधिकारी कार्यकर्ते , महिला आघाडी, बचत गट, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?