मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडयांना जादा बोगी आणि गाडी सुटेपर्यंत तिकीट देण्याची वंचित ची मागणी.
आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला जाण्यासाठी अतिरिक्त बोगी वाढवून जनशताब्दी एक्सप्रेस चे टिकीट बुकींग चालू ठेवन्या विषयी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने उप अधीक्षक कुमार राजीव रंजन यांना निवेदन सादर करण्यात आले यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा अँड. बाळासाहेब आंबेडकर यांची संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे या संविधान सन्मान महासभेसाठी औरंगाबाद शहर जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९:२० वाजता जनशताब्दी एक्स्प्रेस या रेल्वेने जाणार आहेत त्यामुळे आरक्षित प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सदर जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीला अतिरिक्त डबे ( बोगी) लावावी व जनशताब्दी एक्सप्रेस चे बुकींग बंद करण्यात येते ते बुकिंग बंद करण्यात येऊ नये सदरील निवेदनाचा गांभीर्य पुर्वक विचार करावा जेणेकरून सभेला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होणारं नाही याची कुपया दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली.आणि या संदर्भात अधीक्षकांनी नांदेड ला संपर्क करण्याचे आश्वासन दिले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?