स्त्रियांनी विज्ञानवादाची कास धरली पाहिजे - अँड लताताई बामणे
वंचित बहुजन महिला आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने रांजणगाव शे पू ता गंगापूर येथे हळदी कुकुवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या स्त्रियांनी अंधश्रध्दा मध्ये न गुंतता स्त्रियांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले,माता रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विज्ञानवादाची कास धरावी असे त्या म्हणाल्या.
सदरील कार्यक्रमांचे आयोजन वंचित बहुजन महीला आघाडीच्या गंगापूर तालुका अध्यक्षा सौ. जयाबाई सदावर्ते, वंचित बहुजन महीला आघाडीच्या रांजणगाव शे पू शहर अध्यक्षा श्रीमती सीमाताई भंडारे यांनी केले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा ॲड. लताताई बामणे, वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल
हिवाळे,लिंबे जळगाव ग्रामपंचायत सदस्या तथा तालुका कार्यकारिणी सदस्य सविता रुपचंद गाडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव शालिनीताई बर्फे आदी उपस्थित होत्या.
यावेळी सौ.सविता हिवाळे, सौ. सुनीताबाई अमृतराव डोंगरदिवे , श्रीमती वंदनाबाई खिल्लारे, सौ सिंधुताई शेजवळ, लक्ष्मीबाई पठारे, ज्योती पंडित, राधाबाई वाघ, कल्पनाबाई निसरगे आदींसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सौ शालिनीताई वाकोडे यांनी केले व कार्यक्रमांचे आभार अलकाबाई सुरडकर यांनी मानले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?