जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागासह विविध योजनेला ३० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना आज एकाच दिवशी दिले निवेदन.
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या २०% उपकर निधी मधून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लाभार्थींना टिनपत्रे, झेरॉक्स मशीन, संगणक कॉम्प्युटर, पिठाची गिरणी, मिरची काडप मशीन, शेतकऱ्यांना पी व्ही सी पाईप इलेक्ट्रिक मोटार,आईल इंजिन, यांसह अपंगांना ५% मधुन विनाअट घरकुल व व्यक्तिक आथिर्क लाभ देण्यात येतो या योजनेसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी हे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव मागवितात परंतु जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी अगोदर 31 ऑगस्ट पर्यंत व नंतर 8 सप्टेंबर प्रस्ताव मागविले सुध्दा परंतु ग्रामसेवक यांनाच या योजनेची माहिती पंचायत समिती स्तरावरून दिल्या गेली नाही,
यावरून गटविकास अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याशी काही निगडित दलाल सक्रिय असल्याचा आमचा संशय आहे दलाला मार्फत बोगस लाभार्थी दाखवून अधिकारी व दलाल मिळून योजनेचे पैसे बोगस लाभार्थी दाखवून काढून घेतात का यांची चौकशी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.
त्याचप्रमाणे महिला बालकल्याण, पशुसंवर्धन या सह पंतप्रधान,शबरी,रमाई, अपंग, अहिल्यादेवी होळकर अश्या घरकुल योजनांचा ग्रामसभेच्या विषय पत्रिकेत समावेश करण्याचे आदेश देण्यात यावे ग्रामीण भागातील शौचालय बांधकाम करून वापर करणारांना 12 हजार रुपये अनुदान देण्यात येते हे सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे वेबसाईट चालत नाही या कारणांमुळे या योजने पासून हजारो लाभार्थी वंचित आहेत या प्रकरणी सुध्दा आपण स्वतः लक्ष घालून अनुदान वाटप करण्याचे आदेश द्यावेत प्रस्ताव स्विकारण्यासाठी 30 ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदतवाढ द्यावी पात्र असणार्या लाभार्थी यांना विविध विभागाच्या वतीने पत्रव्यवहार करून त्यांचा समक्ष ड्रा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन उप मुख्य कार्यकारी सुदर्शन तुपे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे,जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती,जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, प्रचालक शाहीर मेघानंद जाधव, जिल्हा सम्पर्क प्रमुख गणेश खोतकर, सोशल मीडिया प्रमुख प्रविण जाधव,जिल्हा संघटक सुभाष कांबळे, जिल्हा सदस्य प्रवीण पोळ, जिल्हा सहसचिव अशोक खिल्लारे,रवि रत्नपारखे, गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, शेख नबी खालू, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायतीच्या गटविकास अधिकारी यांना सुध्दा याचं विषयावर सकाळी अकरा वाजता निवेदन देण्यात आले आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?